Post by The Ground Pune

317 followers

भारतीय महिला संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला आहे. पुढील वर्षी म्हणजेच २०२२ साली महिला क्रिकेट चा विश्वचषक असल्यामुळे हा दौरा अतिशय महत्त्वाचा मानला जात आहे. मिताली राज हिच्या नेतृत्वाखाली संघाला कट्टर प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलिया महिला संघाबरोबर लढायचे आहे. मागील लढतीचा इतिहास पाहता दोन्ही संघामध्ये ऑस्ट्रेलिया हाच बलाढ्य संघ ठरला असून भारतीय महिला संघाची कामगिरी अतिशय सुमार राहिली आहे. दुसऱ्या बाजूला ऑस्ट्रेलिया संघ सलग २० पेक्षा अधिक सामने जिंकला असून त्यांचा दबदबा नक्कीच या मालिकेत असणार हे निश्चित. भारतीय संघामध्ये सलामीवीरांपासून अगदी गोलंदाजांना सगळ्यांना सांघिक कामगिरीचे दर्शन घडवावे लागेल तेव्हाच मालिका विजय हा सुकर होईल आणि विश्वचषकामध्ये प्रवेश करताना एक आत्मविश्वास निर्माण होईल. कोमल शिंदे हिने पुढील लेखात या भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचे विश्लेषण केले आहे. संपूर्ण लेख वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा : https://lnkd.in/eVtmz2A5 #TheGround #thegroundcommunity #sportsretold #india #bcci #cricket #WomensCricket #IndVsAustralia #CricketAustralia #MitaliRaj #indiawomenscricketeam

Post content