Post by Teztecch News

726 followers

नागपूर : सुरक्षित, सुलभ आणि आधुनिक वाहतूक व्यवस्थेचा संकल्प नागपूर महानगरपालिका अर्थसंकल्प 2026–27 मध्ये शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी महत्त्वपूर्ण तरतुदी करण्यात आल्या आहेत. रस्ते व वाहतूक पायाभूत सुविधांचा विकास, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे आधुनिकीकरण, इलेक्ट्रिक बस सेवेला चालना तसेच नागरिकांना सुरक्षित, सुलभ आणि गतिमान प्रवासाचा अनुभव देण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. वाढत्या शहराच्या गरजा लक्षात घेऊन आधुनिक वाहतूक व्यवस्थेद्वारे नागपूरला अधिक स्मार्ट, शाश्वत आणि नागरिकाभिमुख शहर बनविण्याचा संकल्प या अर्थसंकल्पातून मांडण्यात आला आहे. #Nagpur #NagpurBudget2026 #NMC #Transport #SmartMobility #CityDevelopment #AapliBus

Post content

Video Content