Post by Tadoba Andhari Tiger Reserve (TATR)

2,770 followers

🌲मसण्या उद, उद मांजर, जवाद्या, झाड कुत्रा ▶️Asian palm civet ▶️(Paradoxurus hermaphroditus) 🌾लहानपणापासून मसण्या उदाच्या कथा ऐकलेल्या आहेत की, स्मशान घाटात जाऊन प्रेत उकरून खातो म्हणून; कुजलेले मास खाण्याच्या सवयीमुळे कदाचित म्हणत असतील,परंतु ठोस पुरावा नाही. 🌾उदमांजर हा रात्रीचर (निशाचर) Nocturnal असुन एक मिश्रहारी(Omnivorous) प्राणी आहे. त्याचे मुख्य खाद्य फळे, कीटक तसेच कुजलेले मास, पक्ष्यांची अंडी, उंदीर व लहान प्राणी आहे. गावामध्ये जेव्हा सीताफळ, पेरू चे सीजन असते तेव्हा बरेचदा ते गावात फळे खाण्यासाठी येतात . त्याचवेळेस बरेचदा ते गावातील कोंबड्यांची शिकार सुद्धा करतात. 🌾उदमांजर का म्हणतात? तर त्याच्या मागील बाजूस शेपटीच्या खाली एक ग्रंथी असते त्या ग्रंथीतून तो एक प्रकारचा वास सोडतो आणि त्याचा सुगंध उदासारखा येतो,त्याच्यामुळे त्याला उदमांजर म्हणतात. त्याचा आकार मांजरी सारखा दिसतो आणि तोंड कुत्र्यासारखे दिसते. त्यामुळे काही भागात याला झाड कुत्रा सुद्धा म्हणतात. याला इंग्रजीत Toddy cat पण म्हणतात. कारण हा प्राणी ताडाच्या झाडांवर चढतो आणि कधी कधी ताडी पितो, त्यामुळे त्याला “Toddy cat” म्हणतात. ताडोबा व चंद्रपूर मध्ये जवाद्या पण म्हणतात. 🌾जंगलातील हर्दुली(Olax scandens), एरोनी(Ziziphus oenopolia), जांभुळ (syzygium cumini),टेंभरु (Diospyros melanoxylon) यांची फळे याला खूप आवडतात. ही आवडीने खातो. या फळांच्या मोसम मध्ये वन भ्रमंती करत असताना त्या फळांच्या बिया त्याच्या विष्टेमध्ये दिसतात. या फळ झाडांच्या बीज प्रसारणामध्ये उद मांजराचा खुप मोलाचा वाटा आहे. 🌾उद मांजर निशाचर आहे रात्री याचा वावर जास्त प्रमाणात असतो. दिवसेंदिवस या प्राण्याची संख्या खूप कमी होत आहे त्याचे मुख्य कारण असे दिसून येत आहे की, जंगल क्षेत्रातून जाणारे जिल्हा,राज्य व राष्ट्रीय महामार्ग. रात्रीच्या वेळेस रस्ता ओलांडताना याचे खुप जास्त अपघात होतात. त्याच्यामुळे याच्या संख्येवर खूप मोठा परिणाम पडलेला आहे. काही मनुष्य समुदायात मांस खाण्यासाठी उद मांजराची शिकार सुद्धा केली जाते. 🌾या प्राण्याचे संवर्धन होणे अतिशय आवश्यक आहे. निसर्ग चक्रातील तसेच अन्नसाखळीतील महत्वाचा प्राणी आहे. वन्यजीव(संरक्षण) अधिनियम, १९७२ या कायद्यात अनुसूची-१ मध्ये समाविष्ट करुन विशेष संरक्षण दिलेले आहे. 🌲रुंदन कातकर🌲 #tatr #civet #wildlife #biodiversity #photograph

Post content