Post by Ravindra Chavan

President, BJP Maharashtra प्रदेशाध्यक्ष, भाजपा महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रभक्त । तत्वनिष्ठ । सेवाव्रती

सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग ४६५ (मोहोळ‑कुरुळ‑कामती‑बसव नगर‑औराद‑बंकलगी‑वळसंग) या ८१.३७ किमी मार्गाच्या रुंदीकरणाला मोदी सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे. यासोबतच रुंदीकरणाच्या कामासाठी ७४०.३८ कोटी रुपयांची तरतूद मंजूर करण्यात आली आहे. सोलापूर शहराच्या या नव्या बायपास रस्त्यामुळे शहरातील वाहतूक कोंडी दूर होईल. तसेच कर्नाटककडून येणारी वाहतूक या बायपासद्वारे वळवण्यात आल्याने आंतरराज्यीय दळणवळण आणखी वेगवान होईल. सोलापूर जिल्ह्यातील वाहतुकीची गती वाढविणारा हा महत्त्वाचा निर्णय घेतल्याबद्दल आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी व केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री आदरणीय नितीनजी गडकरी यांचे मनःपूर्वक आभार ! [ Solapur, NH-465, National Highway Authority, Road & Bridge, Narendra Modi, PM Modi, Nitin Gadkari, BJP4India, BJP4Maharashtra ] #PragatiKaHighway #GatiShakti #Solapur

Post content