Post by Punyanagari
65 followers
ब्रम्हपुरीच्या डोंगे घाटात बुडून विद्यार्थ्याचा मृत्यू ब्रम्हपुरी (चंद्रपूर) : चांदगाव रोडवरील डोंगे घाट येथे मंगळवारी सकाळी पोहण्यासाठी गेलेल्या १६ वर्षीय विद्यार्थ्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. नैतिक अशोक शेंडे (रा. ब्रम्हपुरी) असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून तो ख्रिस्तानंद स्कूलमध्ये इयत्ता दहावीत शिकत होता. बास्केटबॉल खेळल्यानंतर मित्रांसह अंघोळीसाठी गेलेल्या नैतिकने पाण्यात उडी घेतली. मात्र खोल पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला. स्थानिक नागरिकांनी शोधमोहीम राबविली, परंतु तोपर्यंत उशीर झाला होता. घटनेची नोंद ब्रम्हपुरी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. #Accident #AccidentalNews #DongeGhat #BramhapuriNews #StudentTragedy #AccidentalDeath #WaterSafety #MarathiNews #Punyanagari #DainikPunyanagari #NewsUpdate