Post by Padmalay Project
Read Reasearch Reconfirm
आशाबाईंच्या कलाकृतींनी संगीतविश्वाला दिलेले योगदान अमूल्य आहे. त्यांचा स्वर घराघरात , तरुण पिढी पर्यंत पोचलेला. वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर साथ देणारी त्यांची गाणी आजही मनावर गारुड करून आहेत. त्यांच्या वयाच्या साठीत त्यांनी रंगीला रे सारख्या गाण्याला आवाज दिला—त्यांची रेंज आणि मेहनत थक्क करणारी होती! आशाताई एक जिंदादिल व्यक्तिमत्त्व! सुंदर हसणं, नटणं, फुलं माळणं, जरीच्या साड्यांची आवड, संगीतासोबतच खाण्याची, स्वयंपाकाची आवड, आणि कठीण प्रसंग, अतीव दुःख या सगळ्यातही जपलेलं जगण्यावरच अफाट प्रेम ! चिरतरुण, स्वरसंपन्न आशाताईं ! तुमच्या अफाट कर्तृत्वाला आमचा मनःपूर्वक नमस्कार! आज तुम्ही आमच्यात नसलात 😢तरीही तुमचे सूर सदैव रेंगाळत राहतील. आज स्वर्ग स्वरमयी झाला असेल! 🙏🏽भावपूर्ण श्रद्धांजली आशाताई🙏🏽 ! टीम पद्मालय प्रोजेक्ट! Dr. Prachee JavadekarGandhali Divekar, Ph.D Prakash Javadekar #AshaBhosle #LegendaryVoice #EvergreenMelody #MusicalLegacy #TimelessTunes #JindadilSpirit #GracefulSmile #LifeLover #PositiveJourney #StrengthInSorrow