Post by OBC Adhikari Karmachari Sangh

39 followers

न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन! भारतीय न्यायव्यवस्थेतील एक निर्भीड, प्रामाणिक आणि लोकशाही मूल्यांशी बांधील असलेले व्यक्तिमत्त्व म्हणून न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांचे योगदान सदैव स्मरणात राहील. मंडल आयोगाच्या अंमलबजावणीदरम्यान इंदिरा साहनी (मंडल) प्रकरणाच्या संदर्भात न्यायमूर्ती सावंत यांनी स्पष्ट केले होते की, घटनेच्या कलम १६ (४) अंतर्गत 'मागास वर्ग' ओळखण्यासाठी आर्थिक निकष लावता येत नाहीत. मागासलेपणाचे मूळ कारण हे त्यांचे 'सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपणा' हेच असते. आरक्षण हे केवळ सवलत नसून ऐतिहासिक विषमता दूर करून समान संधी निर्माण करण्याचे संविधानिक साधन आहे. हा सामाजिक न्यायाचा व्यापक विचार त्यांनी अधोरेखित केला. #JusticePBSawant #SocialJustice #HumanRights #MandalCommission #ConstitutionalValues #OBCAdhikariKarmachariSangh ओबीसी अधिकारी कर्मचारी संघसोबत जॉईन👇🏻व्हा! *सभासद नोंदणी लिंक:* https://lnkd.in/gxUExZBZ *व्हाट्सएप चॅनेल फॉलो करा:* https://lnkd.in/g9XWiXmh

Post content