Post by Maha Mumbai Metro Operation Corporation Limited.
7,968 followers
हुर्रे...😊 आजचा आनंद हा सदैव संस्मरणीय राहील. मुंबईकरांनो, ऐकलंत का पावसाचं गाणं? ... हो, पण या वेळेस हा पाऊस विक्रमाचा आहे! 🌧️🚇 १५ जुलै रोजी तब्बल ३,११,३०५ मुंबईकरांनी महा मुंबई मेट्रोचा प्रवास करून इतिहास रचला.. आमचा आतापर्यंतचा हा सर्वोच्च एकदिवसीय प्रवासी आकडा ठरला. आणि एवढंच नाही.. गेल्या एका महिन्यांत तब्बल ६ वेळा नव्या विक्रमांची नोंद झाली आहे.. ही बाब किती भन्नाट आहे ना.. त्यात भर म्हणजे, व्हॉट्सॲप तिकीट विक्रीचाही नवा उच्चांक आम्ही गाठला आहे – ६५,५८४ तिकीटं! व्हॉट्सॲप-आधारित मेट्रो तिकिटिंगमध्ये महा मुंबई मेट्रो देशात आघाडीवर आहे. आमच्या एकूण तिकीट विक्रीपैकी २१% बुकिंग WhatsApp वरून होते. देशातील सर्व मेट्रोंपैकी ही सर्वाधिक टक्केवारी आहे. मुंबईकरांनो, याचं श्रेय तुम्हाला जातं. या दुहेरी आनंदासाठी तुमचे मन:पूर्वक आभार! 📈 आमचे रेकॉर्डब्रेकिंग दिवस: ▪️ १५ जुलै – ३,११,३०५ ▪️ १४ जुलै – ३,०१,३०३ ▪️ ८ जुलै – ३,०१,१२७ ▪️ १ जुलै – २,९७,९७२ ▪️ २४ जून – २,९७,६०६ ▪️ १८ जून – २,९४,९७३ #MumbaiInMinutes #MahaMumbaiMetro #MumbaiMoves #RecordRidership #MilestoneMetro #SmartCommute #RideTheChange #TicketOnWhatsApp #ThankYouMumbai #TogetherWeMove #EfficientConnectivity #MMRDA50