Post by Maha Mumbai Metro Operation Corporation Limited.

7,970 followers

२ महिने. १३ विक्रम. मुंबईची नवी जीवनवाहिनी..! कृतज्ञ तुमचे आम्ही मुंबईकर..! २१ ऑगस्ट २०२५ रोजी, तब्बल ३ लाख ३४ हजार ७६६ मुंबईकरांनी महा मुंबई मेट्रो मार्गिका २अ आणि ७ वर प्रवास केला — हा आमचा आतापर्यंतचा सर्वोच्च एकदिवसीय प्रवासी आकडा आहे. १८ जून २०२५ पासून, तुम्ही आमचे प्रवासी विक्रम तब्बल १३ वेळा मोडीत काढले. किती कमाल आहे ना हे? आम्हाला सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद! तुमचा विश्वास हाच आमचा सर्वात मोठा टप्पा आहे. पाऊस असो वा गर्दीची वेळ — अधिकाधिक प्रवासी मेट्रोवर विश्वास ठेवत आहेत, आणि हे आकडे त्याचं प्रमाण आहेत. 💙 🏆 १ जुलै २०२५ पासून १२% वाढ २१ ऑगस्ट, २०२५ – ३,३४,७६६ प्रवासी (नवा उच्चांक) १३ ऑगस्ट – ३,२६,५९३ १२ ऑगस्ट – ३,२५,६५२ १ ऑगस्ट – ३,२१,१९२ १६ जुलै – ३,१२,३७१ ८ जुलै – ३,०१,१२९ १ जुलै – २,९७,९६२ हिरवा प्रवास, एकत्रितपणे 🌱 त्यात भर म्हणजे, व्हॉट्सॲप तिकीट विक्रीचाही नवा उच्चांक आम्ही गाठला आहे – ७३,०४४ तिकीटं! व्हॉट्सॲपवरून मेट्रो तिकीट विक्री करणाऱ्या भारतातील मेट्रो व्यवस्थांमध्ये महा मुंबई मेट्रो आघाडी वर आहे, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. सद्यस्थितीत आमचे ६७% पेक्षा अधिक प्रवासी डिजिटल, कागदविरहित तिकिटांची निवड करून पेपरलेस प्रवास करत आहेत, तर २२% प्रवासी WhatsApp Ticketing चा वापर करत आहेत. सोपं, स्मार्ट आणि पर्यावरणपूरक. 🌍 मुंबईकरांचा प्रवास अधिक सुलभ, सुरक्षित, जलद आणि पर्यावरणपूरक करण्यासाठी आम्ही नेहमीच कटिबद्ध आहोत. पुन्हा एकदा सर्वांचे मन:पूर्वक आभार..! #MetroMeriJaan #330kJourneys #RecordRidership #MahaMumbaiMetro #MumbaiOnTheMove #MumbaiMovesForward #TogetherWeMove #UnstoppableMumbai #MetroMilestones #MumbaiInMinutes #MMRDA50 #RebootingMumbai #ReshapingMMR #EfficientConnectivity

Post content