Post by Maha Mumbai Metro Operation Corporation Limited.

7,968 followers

ब्रेकिंग न्यूज.. ब्रेकिंग न्यूज 🚨 महा मुंबई मेट्रोचा नवा विक्रम: ३९ महिन्यांत ओलांडला २० कोटी प्रवाशांचा टप्पा 🙌 ४ ऑगस्ट, २०२५ ही तारीख आमच्यासाठी अविस्मरणीय ठरली... मुंबईकरांच्या प्रेमामुळे आणि वाढत्या प्रतिसादामुळे आज आम्ही २० कोटी प्रवाशी संख्येचा पल्ला ओलांडला. विशेष म्हणजे दहिसर ते अंधेरी पश्चिम (मेट्रो लाईन २ अ) आणि दहिसर ते गुंदवली (मेट्रो लाईन ७) सेवेत दाखल होऊन फक्त ३९ महिन्यातच हा ऐतिहासिक पल्ला आम्हाला गाठता आला. मुंबईकरांनो, तुमच्या अफाट प्रेम आणि विश्वासामुळेच हे शक्य झाले आहे. सर्वांचे मन:पूर्वक आभार. आमच्या संपूर्ण टीमच्या अथक मेहनतीमुळे हा यश मिळाला आहे. त्यांचे अभिनंदन. विशेष म्हणजे, दहिसर ते अंधेरी पश्चिम (मेट्रो लाईन २अ) आणि दहिसर ते गुंदवली (मेट्रो लाईन ७) या मार्गिका सेवेत दाखल होऊन केवळ ३९ महिन्यांतच हा विक्रम गाठण्यात आम्हाला यश मिळालं. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून मेट्रो २ अ आणि ७ या मार्गिकांचा पहिला टप्पा २ एप्रिल २०२२ रोजी कार्यान्वित झाला. २ एप्रिल २०२२ ते ४ ऑगस्ट २०२५ या कालावधीत या मार्गिकेवरुन २० कोटींहून अधिक लोकांनी प्रवास केला. हा विक्रम केवळ आकडेवारीचा नाही, तर मुंबईच्या मेट्रो क्रांतीचा वेगवान प्रवास आहे. मुंबईच्या गतीला व स्वप्नांना पंख देणारा आणि मुंबईला 'भविष्यासाठी सज्ज' करणारा एक महत्वपूर्ण टप्पा आहे. या प्रवासात अनेक मैलाचे दगड आपण एकत्र गाठले: ✅ पहिल्याच दिवशी प्रवासी संख्या: १९,४५१ ✅ केवळ ९ महिन्यांत: १ कोटी प्रवासी ✅ २५ महिन्यांत: १० कोटी प्रवासी ✅ ३३ महिन्यांत १५ कोटी ✅ आणि आता — फक्त ३९ महिन्यांत: २० कोटी! रोज कामावर जाणाऱ्यांपासून, कॉलेजच्या विद्यार्थ्यांपर्यंत, लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत, महा मुंबई मेट्रोने मुंबईला एकत्र पुढे नेलंय. कामावर जाण्याची घाई असो, मुंबईत येण्याचा आनंद असो किंवा कुटुंबासोबत प्रवासाचा क्षण असो, महा मुंबई मेट्रो प्रत्येक क्षणी तुमच्यासोबत आहे. प्रत्येक कथा वेगळी, पण तेवढीच खास. मुंबईकरांनो, तुमच्यासोबतचा हा आनंददायी प्रवास यापुढेही अखंडपणे सुरुच राहील. तुमच्या उत्स्फूर्त पाठिंब्याबद्दल पुन्हा एकदा मनःपूर्वक आभार! चला, भविष्याच्या दिशेने पुढे जाऊया — एकत्र आणि स्मार्टपणे. #200MillionWithMahaMumbaiMetro #MahaMumbaiMetro #MumbaiMovesForward #TogetherWeMove #UnstoppableMumbai #MetroMilestones #RidershipRecord #MumbaiinMinutes #MumbaiOnTheMove #MMRDA50 #RebootingMumbai #ReshapingMMR

Post content