Post by Maharashtra Housing and Area Development Authority (MHADA)
997 followers
म्हाडा उपाध्यक्षांचा तात्काळ न्यायनिवाडा! श्री. मोहम्मद हाशिम खान कोकण मंडळाच्या सोडतीत २० टक्के सर्वसमावेशक योजनेअंतर्गत ठाणे येथील संकेत क्रमांक ३६८ मधील सदनिकेसाठी यशस्वी अर्जदार ठरले होते. मात्र, विकासकाने सदनिकेची विक्री किंमत भरताना विलंब झाल्याने आकारलेले व्याज माफ करण्यात यावे, याबाबत श्री. खान यांनी लोकशाही दिनात अर्ज केला. या प्रकरणी 'म्हाडा'चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजीव जयस्वाल (भा. प्र. से.) यांनी, संबंधित अधिकाऱ्यांना विकासकाशी बोलून श्री. खान यांचे ०१ लाख ७० हजार रुपयांचे व्याज माफ करण्याचे निर्देश दिले. Mr. Mohammad Hashim Khan, the successful applicant for a flat (Code No. 368) in Thane under the 20% Comprehensive Scheme (Konkan Board lottery), had approached Lokshahi Din seeking a waiver on the interest imposed by the developer for delayed payment of the sale price. Taking prompt action, MHADA Vice Chairman & CEO, Mr. Sanjeev Jaiswal (IAS), instructed officials to coordinate with the developer and ensure the waiver of ₹1.70 lakh in interest for Mr. Khan. A timely and citizen-centric decision by MHADA! . . . #LokshahiDin #MhadaLokshahiDin #Mhada #Mhadahousing #Mhadadreamhouse #Testimonials #MhadaTestimonials #Housingboard #Maharashtra
Video Content