Post by Maharashtra News Network

News Editor at Maharashtra News Network

दोघा तस्करांकडून २७ लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त विमानतळ पोलिसांची कामगिरी : ८ ग्रॅम एमडी, कार, मोटारसायकल जप्त पुणे : अंमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या दोघांना विमानतळ पोलिसांनी पकडून त्यांच्याकडून २६ लाख ७१ हजार ८०० रुपयांची ८ ग्रॅम एमडी पावडर, कार आणि दुचाकी असा माल जप्त केला आहे. प्रीतम प्रफुल्ल कुलकर्णी (वय ३७, रा. साईनाथ नगर, वडगाव शेरी) आणि उबेद अन्सार खान (वय २७, रा. गायकवाड सोसायटी, अमीना मंझिल, सय्यदनगर, हडपसर) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. विमानतळ पोलीस ठाण्याचे तपास पथक ८ एप्रिल रोजी सायंकाळी पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार हरी पुंडे आणि लालू कऱ्हे यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, जनक बाबा दर्गा चौकाजवळ, खराडी बायपास चौकातून फॉरेस्ट पार्ककडे जाणाऱ्या रस्त्यावर एक जण एमडी ड्रग्जची विक्री करत आहे. त्याची शहानिशा करून तपास पथकाने सापळा रचून प्रीतम कुलकर्णी याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ३ ग्रॅम ५९ मिलीग्रॅम एमडी पावडर व मोटारसायकल जप्त केली. त्याच्याकडे केलेल्या तपासात उबेद खान याचे नाव निष्पन्न झाले. तो खुळेवाडी परिसरात ड्रग्ज विक्रीसाठी आला असताना पोलिसांनी त्याला पकडले. त्याच्याकडून ४ ग्रॅम एमडी पावडर व एक स्कॉर्पिओ कार जप्त केली. दोघांकडून मिळून एकूण २६ लाख ७१ हजार ८०० रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड अधिक तपास करत आहेत. ही कारवाई अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त सोमय मुंडे, सहायक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे यांच्या आदेशान्वये, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शरद शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड, पोलीस अंमलदार लालू कऱ्हे, हरीप्रसाद पुंडे, अंकुश जोगदंडे, योगेश थोपटे, रुपेश पिसाळ, सचिन मांजरे, राहुल जोशी, प्रशांत सुतार, सागर कासार, अंबादास चव्हाण यांनी केली. #MaharashtraNewsNetwork #breakingnews #newsupdates #headlines #viralnews #localnews #Politicalnews #crimenews #governmentnews #dailynews #socialnews

Post content