Post by Kishore Shitole

Chhatrapati Sambhajinagar City, District President - BJP

पदवीधर मतदारसंघाबाबत आढावा बैठक भाजपा विभागीय कार्यालयात भाजपा पदवीधर मतदारसंघाच्या अनुषंगाने आयोजित आढावा बैठक भाजपा प्रदेश सरचिटणीस मा. श्री. सुनील राणे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. या बैठकीत त्यांच्या मार्गदर्शनाखाली पदवीधर मतदारसंघाशी संबंधित विविध विषयांचा सखोल आढावा घेण्यात आला. पदवीधर मतदारांशी प्रभावी संपर्क अभियान, संघटनात्मक बळकटी, बूथनिहाय नियोजन तसेच आगामी कार्य योजनांबाबत यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी मा. श्री. सुनील राणे साहेब यांनी कार्यकर्त्यांना केलेले मार्गदर्शन आगामी काळात नवी दिशा आणि ऊर्जा देणारे ठरेल. राष्ट्रहित, संघटन आणि जनसेवा या विचारांना अधिक सक्षम करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने अधिक जोमाने कार्य करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. #आढावा_बैठक #पदवीधर_मतदारसंघ #padvidharmatdarsangh #Meeting #ChhatrapatiSambhajinagar #bjp #leadership #kishoreshitole

Post contentPost contentPost contentPost contentPost contentPost content