Post by Jadhavar Group of Institute Pune
137 followers
७/१२ उताऱ्याचे सखोल मार्गदर्शन कार्यशाळा यशस्वीपणे संपन्न जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने अॅड. शार्दुलराव सुधाकरराव जाधवर कॉलेज ऑफ लॉ, पुणे आणि जाधवर कॉलेज ऑफ लॉ, पुणे यांच्या वतीने “७/१२ उताऱ्याचे सखोल मार्गदर्शन” या उपयुक्त कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत प्रमुख वक्ते अॅड. जगदीश धायतडक (ज्येष्ठ विधिज्ञ व कायदेशीर सल्लागार) यांनी उपस्थितांना ७/१२ उतारा, मालकी हक्क, वारस नोंदी, क्षेत्रफळ, गट क्रमांक, सिटी सर्व्हे क्रमांक, तारण, कर्ज व इतर हक्कांची माहिती तसेच जमीन खरेदी-विक्रीपूर्वी आवश्यक तपासणी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. उपस्थितांनी या कार्यशाळेतून जमिनीशी संबंधित महत्त्वाच्या कागदपत्रांविषयी उपयुक्त माहिती जाणून घेतली. #712extract #landrecord #guidanceworkshop #LegalAwareness #propertyguidance #landdocuments #jadhavarcollegeoflaw #workshopsuccessfullyconducted #pune
Video Content