Post by Hindavi Public School, Satara.

38 followers

"सोन घ्या सोन्यासारख रहा" दरवर्षी दसऱ्याला आपण आपट्याची पाने सोने म्हणून वाटतो. तर जाणून घेऊयात याच आपट्याबद्दल थोडी माहिती... आपट्यास संस्कृत मध्ये अश्मंतक असे म्हणतात. आपटयाला शास्त्रीय नाव 'बौहिनिया रेसीमोसा' (Bouhinia racemose) आहे. या झाडांना दोन दले असलेली पाने असल्यामुळे बौहिनिया हे नाव सोळाव्या शतकातील वनस्पतीशास्त्रज्ञ जॉन व कॅस्पर बौहिन या दोन भावांच्या स्मरणार्थ देण्यात आले आहे. आपट्याचा उपयोग- आपटा हे झाड बहुगुणी औषधी वनस्पती आहे. याची पाने, शेंगांच्या बिया, फुले व झाडाची साल औषध म्हणून वापर केला जातो. सालीपासून दोरखंड बनवतात. झाडापासून डिंकही मिळवला जातो. जुन्या काळात तोटयाच्या बंदुका वापरत, त्यासाठी लागणाऱ्या वाती या झाडाच्या आंतरसालीपासुन तयार होत असत. श्लोक: अश्‍मनंतकः कषायस्तु हिमः पित्तकफापहः| मधुरः शीतसंग्राही दाहतृष्णाप्रमेहजित्‌ || अर्थ: पित्त आणि कफदोषांवर गुणकारी; दाह, तृष्णा आणि प्रमेह यांवर विजय मिळवणारा. धार्मिक महत्व- आपट्याच्या झाडाची पाने सोने म्हणून दसरा या सणाला एकमेकांना वाटली जातात. श्लोक: अश्मन्तक महावृक्ष महादोष निवारण | इष्टानां दर्शनं देही कुरु शत्रुविनाशनम् || अर्थ: आपट्याचा वृक्ष हा महावृक्ष असून तो महादोषांचे निवारण करतो. इष्ट (देवतेचे) दर्शन घडवितो व शत्रूंचा विनाश करतो. #HappyDussehra #Dussehra #Vijayadashami #Navratri #festival #durgamata #ram #India #apta #दसरा #विजयादशमी #school #education #hindavipublicschool

Post content