Post by Dainik Punyanagari

News & Advertising at Punyanagari

.......... प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, आरोपीने एका सुरक्षारक्षकाला ‘कलमा’ पठण करण्यास सांगितले. ते न जमल्याने त्याने तीक्ष्ण शस्त्राने दोघांवर सपासप वार केले. या हल्ल्यात राजकुमार मिश्रा गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेनंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अवघ्या ९० मिनिटांत आरोपी अन्सारीला अटक केली. प्राथमिक चौकशीत तो विज्ञान शाखेचा पदवीधर असून अनेक वर्षे अमेरिकेत वास्तव्यास होता, अशी माहिती समोर आली. २०१९ मध्ये भारतात परतल्यानंतर तो मिरा रोड येथे एकटाच राहत होता आणि ऑनलाईन केमिस्ट्रीचे कोचिंग देत होता. पोलिसांनी आरोपीच्या घराची झडती घेतली असता काही हस्तलिखित नोट्स सापडल्या. त्यामध्ये ‘ISIS’मध्ये सामील होण्याची इच्छा व्यक्त करण्यात आली असून, हा हल्ला त्याचे पहिले पाऊल असल्याचा उल्लेख आढळल्याची माहिती सूत्रांनी दिली. तसेच आरोपीच्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांमधून कट्टरपंथी विचारसरणीशी संबंधित व्हिडिओ आणि काही कागदपत्रेही जप्त करण्यात आली आहेत. लॉकडाऊनदरम्यानचा एकांतवास आणि इंटरनेटवरील संपर्कातून तो कट्टरपंथी विचारांकडे वळला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणाचे धागेदोरे एखाद्या आंतरराष्ट्रीय दहशतवादी नेटवर्कशी जोडलेले आहेत का, याचा तपास एटीएसकडून सुरू असून, पुढील चौकशीत आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. #MiraRoad #MumbaiCrime #LoneWolfAttack #ISISLink #BreakingNews #MumbaiPolice #ATS #CrimeNews #TerrorAlert #IndiaSecurity #Radicalization #MumbaiUpdates #MarathiNews #TopNews #DailyNews #CrimeStory #PoliceInvestigation #SecurityAlert #ViralNews #Trending #Punyanagari #DainikPunyanagari [Mira Road attack, lone wolf terror, ISIS connection India, Mumbai crime news, ATS investigation, radicalization case, security guard attack, Maharashtra crime, terror alert India, breaking Marathi news, Punyanagari, Dainik Punyanagari]

Post content

Video Content