Post by CIDCO _LTD
We Make Cities.
नवीन मुंबईच्या भविष्यकालीन चलनशीलतेचे नियोजन दि. २३ जुलै २०२५ रोजी सिडको भवन येथे सिडकोचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. विजय सिंघल यांच्या अध्यक्षतेखाली सर्वंकष चलनशीलता आराखडा (Comprehensive Mobility Plan - CMP) या विषयावर आढावा बैठक घेण्यात आली. या आराखड्याचा उद्देश नवीन मुंबई परिसरातील परिवहन कार्यक्षमता आणि कनेक्टिव्हिटी वाढवणे हा आहे. CMP अंतर्गत रस्ते, मेट्रो, रेल्वे आणि जलमार्ग या बहुविध परिवहन प्रणालींचे बळकटीकरण करून नवीन मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (NMIA), खारघर येथील कॉर्पोरेट पार्क, नवीन मुंबई एरोसिटी, एज्युसिटी आणि गृहनिर्माण योजना प्रमुख विकास प्रकल्पांसोबत अखंड एकात्मिकरण करण्यावर भर देण्यात आला आहे. सार्वजनिक वाहतूक, सुयोग्य वाहतूक व्यवस्थापन व सुरक्षिततेसाठी सुदृढ यंत्रणा विकसित करण्यावरही या आराखड्यामध्ये भर देण्यात आला आहे. श्री. विजय सिंघल यांनी अधिकाऱ्यांना तात्काळ, मध्यमकालीन व दीर्घकालीन परिवहन धोरणांची आखणी करण्याचे स्पष्ट निर्देश दिले, जे शहरातील वाहतुकीला पर्यावरणपूरक आणि सर्वसमावेशकतेकरिता मार्गदर्शक ठरतील. या बैठकीस उपस्थित मान्यवर: 🔹 श्री. शान्तनु गोयल – सहव्यवस्थापकीय संचालक, सिडको 🔹 श्रीमती. गीता पिल्लई – मुख्य महाव्यवस्थापक (परिवहन व विमानतळ), सिडको 🔹श्रीमती. बिंदू मुरलीधर – अतिरिक्त मुख्य परिवहन अभियंता, सिडको 🔹 श्रीमती. प्रिया रवी कुमार – अतिरिक्त मुख्य नगररचनाकार, सिडको 🔹 व इतर सिडको अधिकारी Planning Navi Mumbai's Future Mobility A review meeting on the Comprehensive Mobility Plan (CMP) was held on July 23, 2025, at CIDCO Bhavan under the chairmanship of CIDCO's Vice Chairman and Managing Director, Shri. Vijay Singhal. The CMP aims to enhance transport efficiency and connectivity across the Navi Mumbai region. The plan focuses on strengthening multi-modal transport systems—roads, metro, railways, and waterways—to ensure seamless integration with major development projects like the Navi Mumbai International Airport (NMIA), Corporate Park at Kharghar, Navi Mumbai Aerocity, EduCity, and various housing schemes. The CMP also emphasizes the development of a robust public transport system, effective traffic management, and enhanced safety mechanisms. Shri. Vijay Singhal directed officials to formulate short-term, mid-term, and long-term transport strategies that promote environmentally sustainable and inclusive urban mobility. Officials present at the meeting: 🔹 Shri. Shantanu Goel – Joint Managing Director, CIDCO 🔹 Smt. Geeta Pillai – Chief General Manager (Transport & Airport), CIDCO 🔹 Smt. Bindu Muralidhar – Addl. Chief Transport Engineer, CIDCO 🔹 Smt. Priya Ravi Kumar – Addl. Chief Planner, CIDCO 🔹 Other CIDCO officials #cidcoupdates
Video Content