Post by Build India with Vaibhav Dange
252 followers
दिल्ली मराठी प्रतिष्ठानच्या वतीने श्री. वैभव डांगे यांच्या नेतृत्वाखाली, तसेच श्री. विवेक गर्गे ( Vivek Garge ), श्री. महेंद्र लड्डा ( Mahendra Laddha ), श्री. नितीन सरदारे ( Nitin Sardare ) , श्री. विनोद देशमुख ( Vinod Deshmukh ) आणि श्री आनंद गोयल गणेश सेवा मंडळ यांच्या उपस्थितीत, दिल्लीच्या माननीय मुख्यमंत्री श्रीमती रेखा गुप्ता ( Rekha Gupta ) यांची भेट घेण्यात आली. या भेटीत सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या गणेशोत्सवाबाबत तसेच दिल्लीतील मराठी समाजाच्या विविध सांस्कृतिक उपक्रमांची माहिती माननीय मुख्यमंत्री महोदयांना देण्यात आली. गणेशोत्सव समित्यांना भेडसावणाऱ्या प्रमुख अडचणी — जसे की पंडाल उभारणीसाठी आवश्यक कालावधी, विसर्जनासाठी योग्य व्यवस्था, सामूहिक मिरवणुका आणि अनंत चतुर्थी व चतुर्दशीसाठी राजकीय सुट्टी — यांसंदर्भात सविस्तर निवेदन सादर करण्यात आले व योग्य हस्तक्षेप करून या समस्यांचे निराकरण करण्याची विनंती करण्यात आली. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या सर्व विषयांवर सकारात्मक भूमिका घेत लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. #DelhiMarathiPratishthan #GaneshUtsav #MarathiCommunity #Delhi #EcoFriendlyGanesh #CulturalHeritage