Post by BJP Chhatrapati Sambhajinagar City
32 followers
नाशिक येथील कॉर्पोरेट जिहाद प्रकरणातील निदा खानला आश्रय देणारे एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल, तसेच मेराज खान यांनी महानगरपालिका निवडणुकीत खोटी कागदपत्रे सादर करून जनतेची दिशाभूल करत निवडणूक लढवल्याचा गंभीर प्रकार समोर आला. लोकशाही व्यवस्थेचा गैरवापर करून नागरिकांच्या विश्वासाशी केलेला हा विश्वासघात अत्यंत निषेधार्ह असून, अशा प्रकारांना कोणतीही माफी नाही. जनतेची फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे, अशी ठाम भूमिका घेत आज सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे महानगरपालिका आयुक्त यांना निवेदन दिले. या निवेदनाद्वारे मेराज खान यांचे नगरसेवक पद तात्काळ रद्द करण्यात यावे, तसेच संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी महापालिका आयुक्तांकडे करण्यात आली. #matinpatel #merajpatel #nashiktcs #AIMIM #tcsconversioncase #nidakhan #kishorshitole #bjpleader #chhatrapatisambhajinagar