Post by Ashwini Pawar
Reporter @Sakal Media Group l Content Writter l Blogger
'तू पिंपरी चिंचवड आवृत्तीला जॉईन होतेयस, डिजिटल टीमसोबत मी बोलतो. ' पावणेतीन वर्षापूर्वी सकाळचे संपादक सम्राट फडणीस सरांचे हे वाक्य होते. सकाळच्या युट्यूब चॅनेलसाठी माझी निवड झाली होती. ही गोष्ट मी सम्राट सरांना सांगितल्यावर त्यांनी तू प्रिंटलाच जॉईन हो असा सल्ला दिला. आत्तापर्यंतचा केवळ इलेक्ट्रॉनिक मिडियामधला अनुभव आणि त्यानंतर करिअरमधला तीन वर्षांचा गॅप यामुळे प्रिंटमध्ये काम करण्याचं खरं तर दडपण आलेलं. मुंबई, पुणे याच शहरांमधे आधी पत्रकारिता केली होती. या शहरांत राहिले असले तरी इथे काम करण्याची ही पहिलीच वेळ होती. क्राइम आणि पॉलिटिकल या दोन बीट शिवाय पिंपरी चिंचवडमध्ये फार काही नाही असंही काहींच मतं होतं, आहे. पण जसं काम करायला सुरुवात केली. कामाचा आवाका समजू लागला. २००८ मध्ये पुण्यात सकाळ मध्ये पहिल्यांदा इंटर्नशिप केली होती. त्यानंतर जवळपास १५ वर्षाने पुन्हा 'सकाळ' मध्ये रुजू झाले आणि एक वर्तुळ पूर्ण झाले. इलेक्ट्रॉनिकची भाषाशैली आणि वृत्तपत्रांची लेखनशैली यात बराच फरक असतो. ती शैली आत्मसात करणंही एक टास्क होता. मात्र, वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने आणि प्रोत्साहनामुळे वैद्यकीय, आयटी, सांस्कृतिक आणि पर्यावरण हे बीट चांगल्या पद्धतीने कव्हर करता आले. 'सकाळ'ने मला काम करण्याची संधी दिली त्यामुळे माझ्याच शहरात मला ओळख मिळाली. अनेक चांगले लोक जोडले गेले. ज्या सकाळ चित्रकला स्पर्धेत मी भाग घेत होते त्याच स्पर्धेच्या सुपरव्हिज साठी स्पर्धा केंद्रावर जाण्याची संधी मिळाली. वाचक , इंटर्न ते बातमीदार हा पावणेतीन वर्षांचा प्रवास आता थांबवत आहे. इथवरच्या प्रवासात सोबत असणाऱ्या , मार्गदर्शन करणाऱ्या संपादकांचे, वरिष्ठांचे, सहकाऱ्यांचे आणि वाचकांचे मन:पूर्वक आभार! Samrat Phadnis Shital Pawar #SakalMedia #JournalismJourney #PimpriChinchwad #NewBeginnings #MediaLife #Gratitude