Post by Akbar Shaikh

President "Madat Foundation" Chief Editor "Madat Express News Paper & Web Portal

संतापजनक ! पिंपरी-चिंचवडमध्ये पुन्हा एकदा माणुसकीला काळीमा फासणारी घटना. काळेवाडीतील एकतानगर परिसरात अवघ्या अडीच वर्षांच्या चिमुरडीवर ४७वर्षीय नराधमाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आंब्याचे आमिष दाखवून या विकृताने हे घृणास्पद कृत्य केले. पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी विजय भोसले याला बेड्या ठोकल्या आहेत आणि त्याच्यावर 'पोक्सो' (POCSO) आणि 'BNS' अंतर्गत कठोर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे शहरात संतापाची लाट असून एकच प्रश्न उभा राहतो... कायद्याचा धाक कुठे गेला आहे? पालकांसाठी महत्त्वाचे आवाहनः आपल्या लहानग्यांची विशेष काळजी घ्या. त्यांना शेजाऱ्यांकडे किंवा कोणत्याही व्यक्तींसोबत एकटे सोडू नका. पिंपरी-चिंचवड आणि परिसरातील प्रत्येक ताज्या आणि अचूक बातमीसाठी फॉलो कराः आतला आवाज #mmadatexpress #PimpriChinchwad #Kalewadi #PuneNews #AatlaAawaaz MarathiNews PCMC PCMCCity Crime News Marathi Maharashtra News Child Safety JusticeForChildren POCSO StopChildAbuse Pimpri Chinchwad News PuneCity NewsUp

Post content