Post by Anil Darekar
Senior Assistant Manager - MEP Services | Electrical - Fire Fighting - HVAC - Plumbing - Water Treatment | Orbittal Electromech | MEP Contractor | Social Worker
❣ *संस्कार फाउंडेशन ने आष्टी तालुक्यातील मंगेश वाळके या विद्यार्थ्याला दत्तक घेऊन त्याचा संपूर्ण शैक्षणिक खर्च उचलला.* ❣ ❣ *_माझे वडील_* ❣ शाळेत शिक्षिकेने निबंध लिहायला लावला, निबंधाचा विषय होता "माझे वडील". अवघ्या नऊ वर्षाच्या इयत्ता चौथीमध्ये शिकणाऱ्या मंगेश नावाच्या मुलाने आपल्या आयुष्याची दुःख भरी कहानी त्या निबंधात उतरवली. अक्षरशा प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी येईल, अशी त्या अवघ्या नऊ वर्षाच्या मुलाच्या आयुष्याची कहाणी आहे. सध्या चौथीत शिक्षण घेणाऱ्या मंगेशचा वडिलांचा आधार हरवलेला आहे, आई दिव्यांग आहे, अशा परिस्थितीत जगायचे कसे हा प्रश्न त्याच्यापुढे उभा आहे. पण मंगेश परिस्थितीवर मात करून जगतो आहे. स्वतःच्या शिक्षणाचा प्रश्न त्यांच्या डोळ्यासमोर उभा असतानाच आई दिव्यांग असल्यामुळे आईची जबाबदारी सुद्धा इतक्या लहान वयात त्याला उचलावी लागत आहे. सध्या आईला घरकामात मदत करतो आणि आपले शिक्षण करतो आहे. पप्पा तुम्ही लवकर परत या, आम्हाला चोरांची खूप भीती वाटते, अशी भावनिक साद मंगेश ने निबंधातून त्याच्या वडिलांना दिली आहे. आयुष्यात मोठे सरकारी अधिकारी बनायचे स्वप्न मंगेश ने उराशी बाळगलेली आहे. धन्यवाद ❣संस्कार फाउंडेशन❣ अनिल दरेकर - 9822801676 #Anath #India #CM #CMO #PM #PMO #Modi #Maharashtra #Education #Viral #ViralNews #News #BreakingNews #Social #SocialWork #Sanskar #SanskarFoundation #Mother #Father #AAi #Baba #Love #Friends #Teacher #Politics #Job